
कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 47 गावांमध्ये यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवात डॉल्बी-डीजेचा आवाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाठार पोलीस ठाणे हद्दीत एकूण 147 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱया मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तर नियमांचे काटेकोर पालन करून शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱया मंडळांचा पोलिसांकडून सन्मान करण्यात येणार असल्याचे वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुशील भोसले यांनी सांगितले.
वाठार स्टेशन येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक नुकतीच वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुशील भोसले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या पदाधिकाऱयांना विविध सूचना देण्यात आल्या.




























































