टोमॅटोचा टेम्पो खड्ड्यात कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील शेलू गावाजवळ पुन्हा एकदा निमुळत्या रस्त्यामुळे भीषण अपघात झाला. टोमॅटो वाहतूक करणारा टेम्पो रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक थोडक्यात बचावला.

बारामती येथील चालक टोमॅटो घेऊन कल्याण बाजारपेठेत उत्तरवून परतीच्या प्रवासात कर्जतच्या दिशेने येत होता. नेरळजवळील शेलू गावाजवळ अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खाड्यात कोसळला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या राज्य मार्गावर हजारो वाहने धावतात. मात्र शेलू येथील नेरळ पोलीस चेकपोस्ट येथील अवघा ५०० मीटरचा रस्ता आजही रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. हा भाग वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने काम रखडले आहे.