केरळात कारमध्ये सापडले दीड कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ-कर्नाटक सीमेवरील वायनाड येथे एका कारच्या सीटखाली तब्बल 1 कोटी 44 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. कारचालकाने चलाखीने सीटखाली गुप्त पेटी तयार केली होती, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोट्यवधी रुपयांच्या या काळ्या पैशांचा डाव अखेर उधळला. एका सिक्रेट पेटीत 1.44 कोटी रुपये लपवण्यात आले होते. तिरुनेल्ली पोलीस आणि जिह्याचे विशेष अमली पदार्थविरोधी पथक कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते.