
सामना ऑनलाईन । मुजफ्फरनगर
देवबंदच्या दालूल उलूम यांनी आणखी एक वादग्रस्त फतवा काढला आहे. या शरिया फतव्यामध्ये त्यांनी असं म्हटले आहे की, दाढी आणि वॅक्स करणे हे शरिया नियमाच्या विरुद्ध आहे.
महिला आणि पुरुषांनी दाढी किंवा हातापायाचे वॅक्सिंग करणे योग्य आहे का? या अब्दुल अजीज नावाच्या मुस्लीमाने विचारलेल्या शंकेला देवबंदच्या फतवा विभागाने नाभीच्या खालच्या भागातले तसेच काखेतील आणि मिशी याच्या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य भागातील केस काढणे हे शरियाला मान्य नाही. तसेच हाता पायावर वॅक्सिंग आणि दाढीचे केस काढणे हे मुस्लीम संस्कृती विरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
या वादग्रस्त फतव्याबद्दल देवबंदचेच मौलाना सलीम अशरफ कास्मी यांना विचारले असता ते म्हणाले की, हा फतवा पुर्णपणे योग्य असून तो शरिया नियमानुसार आहे हे लक्षात घ्यावे. या फतव्यामध्ये वॅक्सिंग आणि दाढीला ‘खिलाफ ए अदब’ म्हटले आहे.
























































