आता व्हॉट्सऍपवरही रिमाइंडर

356

मित्रमैत्रिणींचा बर्थडे असो किंवा ऑफिसातील महत्त्वाची मिटींग… कोणत्या ना कोणत्या कारणासाठी स्मार्टफोनमध्ये रिमाइंडर लावणाऱयांची संख्या काही कमी नाही. पण आता व्हॉट्सऍपच रिमाइंडरचे काम करू लागले तर…? दिवसातील जास्तीत जास्त वेळ अनेकजण व्हॉट्सऍपवर घालवतात. आता याच व्हॉट्सऍपवर युजर्सना रिमाईंडरही मिळणार आहे.

रिमाईंडर लावण्यासाठी युजर्सना मोबाईलमध्ये any.do हे ऍप डाऊनलोड करावे लागले. या ऍपच्या माध्यमातून सेट केलेल्या वेळेनुसार रिमाईंडर मिळणार आहेत. टेक वेबसाईट ऍण्ड्राईड पोलिसच्या माध्यमातून any.do ने व्हॉट्सऍपसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या फीचरमुळे युजर्सची अनेक कामे सोपी होणार आहेत. कुणाला फोन करणे, शॉपिंगला जाणे यांसारख्या अनेक गोष्टींची आठवण या फिचरद्वारे होणार आहे.

असा करा रिमाइंडर सेट

  • रिमाइंडर कोणत्याही युजर्सला फॉरवर्ड करता येईल.
  • ऍपमध्ये कोणताही टास्क केल्यानंतर रिमाइंडरची विचारणा केली जाते.
  • रिमाइंडर सेट केल्यानंतर ठरलेल्या वेळेला व्हॉट्सऍपच्या माध्यमातून नोटीफिकेशन येईल.
  • whatsapp.any.do या लिंकला भेट दिल्यास ऍप सेटिंगमध्ये जाऊन हा integration पर्याय निवडावा लागेल.
  • येथे व्हॉट्सऍपवर क्लिक केल्यास मोबाईल नंबर टाकून अकाऊंट लिंक करावे.
  • त्यानंतर फोनवर सहा अंकी कोड येईल. हा कोड टाकल्यावर रिमाइंडर सक्रिय होईल.पाठवले जाणारे एसएमएस सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपली प्रतिक्रिया द्या