
नुकतेच विदेश दौऱ्यावर जाऊन आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत, परंतु गेल्या 14 ते 15 महिन्यांपासून धगधगत असलेल्या हिंसाचारग्रस्त मणिपूरला मोदी कधी भेट देणार, अशा शब्दांत इंडिया आघाडीने पंतप्रधानांवर सणसणीत टीका केली आहे. युक्रेनचा दौरा सुरू करण्यापूर्वी किंवा नियोजित दौऱ्यानंतर ते जातीय हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही सहभागी झाले. मात्र, मणिपूरची जनता आता थेट प्रश्न विचारत आहे की, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मोदींची स्वतंत्र भेट घेऊन मणिपूरच्या हिंसक स्थितीबाबत चर्चा केली का, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत मोदींच्या युव्रेन दौऱ्यावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑगस्ट रोजी युक्रेनच्या दौऱ्यावर चालले आहेत. यावेळी ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार असून विविध मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत.




























































