
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन टी-20 क्रिकेट सामन्यांसाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर झाला असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी दौऱयाच्या पार्श्वभूमीवर अल्झारी जोसेफला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच शिमरॉन हेटमायरला डच्चू देत जॉन्सन चॉर्ल्सला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयावर विंडीजला दोन कसोटी, तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे अल्झारी जोसेफला विश्रांती देण्याचा निर्णय विंडीजच्या संघनिवड समितीने घेतला आहे.
वेस्ट इंडीजचा टी-20 संघ ः रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शाय होप, जॉन्सन चॉर्ल्स, रोस्टन चेज, मॅथ्यू पह्डर, जेसन होल्डर, अकिल होसेन, ब्रॅण्डन किंग, माईल मेयर्स, गुडाकेश मोती, निकोलस पुरन, आंद्रे रसल, शेरफेन रुदरपर्ह्ड, रोमारियो शेफर्ड, ओशाने थॉमस राम.






























































