चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कोयत्याने वार; पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना 13 फेब्रुवारीला बालेवाडीतील अष्टविनायक चौकात घडली. याप्रकरणी पतीला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश राजाराम डिंबळे (वय 27, रा. थेरगाव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि गणेश पती-पत्नी आहेत. काही दिवसांपासून गणेश तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

त्याच रागातून 13 फेब्रुवारीला संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास त्याने कोयत्याने पत्नीवर हल्ला केला. त्यामुळे पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने पत्नीच्या मित्रालाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत.