
बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही तिने पत्र पाठवले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आयुष्य संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही, असे या महिलेने पत्रात म्हटले आहे.
शेवाळे यांनी लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केला. त्यांचे लग्न झाल्याची कल्पना होती, मात्र आपले पत्नीसोबत वाद होत असून लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले होते, असे या महिलेचे म्हणणे आहे. तिने हे पत्र ट्विटवर शेअर केले आहे.
काही दिवसांपूर्वीच या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता. एप्रिल महिन्यात या महिलेने साकीनाका पोलिसांत तक्रार दिली आहे.






























































