सिन्नरमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, भुलीचे इंजेक्शन घेतल्याचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । नाशिक

सिन्नर येथील भूलतज्ञ डॉ. वैजयंती काकडे (43) यांनी बुधवारी राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी भूलीचे इंजेक्शन घेतल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सिन्नर येथे नाशिक-पुणे महामार्गाजवळ वाजे पेट्रोलपंपासमोर डॉ. काकडे यांचे हॉस्पिटल व घर आहे. डॉ. वैजयंती या भूलतज्ञ, तर त्यांचे पती डॉ. अभिजित गजेंद्र काकडे हे स्त्रीरोग तज्ञ आहेत. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अभिजित यांना डॉ. वैजयंती घरात कुठेच नसल्याचे लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली असता घराच्या गच्चीवर त्या बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांच्या जवळच भुलीचे इंजेक्शन पडलेले होते. डॉ. अभिजित यांनी तपासले तेव्हा त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी डॉ. अभिजित काकडे यांनी दिलेल्या माहितीवरून सिन्नर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.