महिलेचे फेसबुक केले हॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महिलेचे फेसबुक हॅक करून तिला अश्लील मेसेज पाठवल्याची घटना घडली असून याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या गोरेगाव परिसरात राहत असून त्यांचे फेसबुकवर अकाऊंट आहे. मार्च महिन्यात अज्ञात व्यक्तीने त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यांचा युजर आयडी बदलला तसेच त्यांच्या फेसबुकवर अश्लील मेसेज पाठवले. महिलेने फेसबुकवर ऍक्सेस केले असता ऍक्सेस होत नव्हते. तिच्या परिचित असलेल्या व्यक्तीने अश्लील मेसेजबाबत त्यांना माहिती सांगितली असता तिला जबर धक्काच बसला. तिने गोरेगाव पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकारची माहिती गोरेगाव पोलिसांना कळवली. तिच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून या गुह्याच्या तपासाकरिता सायबर पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.