पवई आयआयटीला जगातील ‘टॉप-10’मधील शिक्षणसंस्था बनविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवई येथील आयआयटी मुंबईने गेल्या सहा दशकांमध्ये वेगाने प्रगती केली असून येत्या दहा वर्षांत आयआयटी मुंबईला जगातील ‘टॉप 10’मध्ये पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी केले. आयआयटी मुंबईच्या 61 व्या स्थापनादिनी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांना प्रा. शर्मा यांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया 7 विद्यार्थ्यांना, 5 माजी विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. 12 विद्यमान प्राध्यापकांना आयआयटी मुंबई संशोधन पुरस्कार देण्यात आला तर महत्त्वाचे संशोधन केल्याबद्दल देण्यात येणारा प्रा. कृती रामअमृतम पुरस्कार केमिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्रा. सुजीत जोगवार यांना प्रदान करण्यात आला.