‘अजूनही लढत आहे’! नव्या WFI अध्यक्षाच्या निवडीवर विनेश फोगटची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने नाराजी व्यक्त केली आहे.

विनेश फोगट ही कुस्तीपटूंपैकी एक आहे ज्यांनी कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळाच्या आरोपांवरून निदर्शने केली. विरोधानंतर ब्रिजभूषण सिंह यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

‘आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे, हे दु:खद आहे. आम्ही आमचे दु:ख कोणाला सांगायचे? आम्ही अजूनही लढत आहोत’, असं म्हणत फोगटच्या अश्रूंचा बांध फुटला.

कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी गुरुवारी मुख्य मतदान निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच माध्यमांना संबोधित केलं. या वर्षी जानेवारीत ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी निवडणुकीच्या निकालाबाबत निराशा व्यक्त केली होती.