नागपूरच्या लढाईत विकास भारी! नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे थेट लढत, भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची एकजूट

>>महेश उपदेव

देशात रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यात राज्याच्या उपराजधानीत चुरशीची लढत होत आहे. गडकरी यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. योगीराज लांजेवार यांच्याकरिता बसपाच्या नेत्या मायावती यांचीही सभा झाली. मात्र महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे कॉँग्रेसचे विकास ठाकरे यांनी भाजपला चांगलाच घाम पह्डला आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार रिंगणात असले तरी पेंद्रीय मंत्री व भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत दिसून येत आहे. विकास ठाकरे यांच्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसचे पदाधिकारी तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला भिडल्याचे चित्र आहे. गडकरी यांनी पाच लाख मतांनी विजयी होण्याचा दावा जरी केला असला तरी विकास ठाकरे यांच्या झंझावातामुळे कोण किती मतांनी विजयी होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

विकास ठाकरे यांच्यासाठी काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, नितीन राऊत मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विकास ठाकरे यांना नागपुरात येऊन कानमंत्र दिला, राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली आहे. वंचितने विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया आपले सर्व शिवसैनिक घेऊन कामाला लागले आहेत.
फडणवीसांची पायपीट

एकही पोस्टर लावणार नाही अशी घोषणा गडकरी यांनी केली होती, पण विकास ठाकरे यांनी गल्लोगल्ली प्रचार करून गडकरींना घाम फोडला आहे. त्यामुळे गडकरी यांच्या प्रचाराकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाला चकरी लागल्यासारखे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. गडकरी यांचे संपूर्ण कुटुंब मतदारांपर्यंत पोहचत आहे.

विकास ठाकरे यांचे स्वतःचे नेटवर्क आहे, जेमेची बाजू म्हणजे काँग्रेसमधील मुत्तेमवार, चतुर्वेदी, नितीन राऊत हे तीन गट एकत्र येऊन काम करीत आहेत. विकास ठाकरे यांची स्वतःची वेगळी व्होटबँक असून नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

z भाजपकडून मागील 10 वर्षांत या मतदारसंघात करण्यात आलेल्या विकासकामांच्या नावावर मते मागण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी तर गडकरी यांच्या नावानेच प्रचार सुरू आहे.
z ‘स्मार्ट सिटी’ असली तरी शहरात अनेक मूलभूत समस्या कायम आहेत. अगदी पॉश भागांनादेखील पुराचा मोठा फटका बसला होता. काँग्रेसकडून या मुद्दय़ांवर प्रचार सुरू आहे.
z नागपुरात विकासकामे झाली तरी मोठय़ा पंपन्या, उद्योग व रोजगारनिर्मिती हे मुद्दे काँग्रेसकडून उचलण्यात येत आहेत. तर भाजपकडून आकडेवारी सादर करत या सर्व गोष्टी झाल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे.
z भाजपकडून या निवडणुकीत एकूण मतदान वाढावे यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. महायुती व महाविकास आघाडी बुथ प्रमुखांवर विशेष लक्ष देत आहे. कोणता उमेदवार किती मत्ताधिक्याने निवडून येईल हे आताच सांगणे कठीण आहे.