मोदी म्हणजे सीबीआय, आरबीआय गिळणारा ‘अॅनाकोंडा’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-tension

सामना ऑनलाईन । अमरावती

आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देशम पक्षाचे अर्थमंत्री यनामाला रामकृष्णुदू यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांना ‘अॅनाकोंडा‘ म्हटले आहे. यनामाला रामकृष्णुदू म्हणाले की, ते सीबीआय, आरबीआयला गिळत आहेत. त्यांच्या या आरोपामुळे भाजप खवळला असून प्रदेश अध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण यांनी चंद्राबाबू नायडू हे भ्रष्टाचाराचे राजा असल्याचा पलटवार केला आहे.

सफेद घोडय़ावरील तलवारवाला हीरो
मोदींची तुलना शंकराच्या पिंडीवरील विंचवाशी करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज पुन्हा एकदा मोदींवर हल्ला चढवला आहे. मोदी हे सफेद घोडय़ावरील तलवारवाले हीरो असून सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ठावूक आहेत असेच त्यांचे वागणे आहे. मोदी याच एका व्यक्तीचे सरकार असून सर्वजण त्यांच्याच इशाऱ्यावर नाचत आहेत असे थरूर यांनी म्हटले आहे.

summary- yanamala ramkrishnadu calls modi as anaconda