
सामना ऑनलाईन, मुंबई
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. त्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारले जाणार आहे. विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षा, पत्रकारिता पदवी व पदविका, बीए, लायब्ररी सायन्स, एम.ए., बीएस सी, एमबीए, एमएससी तसेच आरोग्य विज्ञान शाखा, शिक्षणशास्त्र शाखा, संगणक शास्त्र, विविध व्यवसायपयोगी अभ्यासक्रम अशा विविध अभ्यासक्रमांसाठी मुक्त विद्यापीठाचे प्रवेश सुरू झाले आहेत. ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac किंवा www.ycmou.ac.in कर नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश हेल्पलाइनदेखील विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आली असून त्यासाठी 0253-2230580, 2231795 वर संपर्क साधता येईल.


























































