बंद घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी 4 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 18 डिसेंबरला पहाटे सव्वापाचच्या सुमारास कल्याणीनगरमधील कारनेशन सोसायटीत घडली. याप्रकरणी गौरव चमेली (वय 37 रा. कल्याणीनगर ) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव आणि त्यांचे शेजारी थोकुर चौटा हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उचकटून गौरव यांच्या घरातील 2 लाख 80 हजारांचा ऐवज आणि थोकुर यांच्या घरातील 1 लाख 20 हजारांचा ऐवज मिळून 4 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डोंबाळ तपास करीत आहेत.

























































