
उत्तर प्रदेशच्या मेरठ इथून चार टाईम बॉम्बसह एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने ही कारवाई केली आहे. पकडलेल्या आरोपीचं नाव जावेद शेख असं आहे.
जावेदकडे चार बाटल्या टाईम बॉम्ब सापडला असून त्याने काचेच्या बाटल्यांच्या मदतीने ही आयईडी स्फोटकं बनवल्याची माहिती दिली आहे. जावेदकडे केलेल्या चौकशीत त्याला इमराना नावाच्या महिलेने या बॉम्बची ऑर्डर दिल्याचं म्हटलं आहे. तसंच, जावेद याचं नेपाळ कनेक्शनही आढळलं आहे. अद्याप जावेद याचं कोणत्याही दहशतावादी गटासोबत संबंध आढळलेले नसले तरीही सुरक्षा यंत्रणांनी सखोल तपास सुरू केला आहे.
























































