
शरीराचे स्नायू बळकट व्हावेत, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी बऱ्याचदा चिकन सूप पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण, सध्या काही तरुणींमध्ये एक खूळ व्हायरल झालं असून आकर्षक फिगरसाठी त्या शरीरात चिकन सूप टोचून घेत आहेत.
आफ्रिकेतील काही तरुणींमध्ये हे खूळ वेगाने पसरत आहे. सोशल मीडियावर अशा चिकन सूपचा ट्रेंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंडमुळे सध्या वेगाने हा ट्रेंड पसरत चालला आहे. आफ्रिकेतील काही फॅशनची आवड असलेल्या तरुणी आपल्या नितंबांमध्ये चिकन सूप टोचून घेत आहेत.
इंजेक्शनच्या माध्यमातून त्या आपल्या शरीरात चिकन सूप भरत आहेत. शरीरात गेल्यावर ते सूप घट्ट होऊन जातं. त्यामुळे शरीर आकर्षक दिसतं असा त्यांचा दावा आहे. त्यासाठी त्या बाजारात मिळणारे चिकन सूपचे स्टॉक क्युब्ज विकत घेत आहेत. या क्युब्जमध्ये मॅगी, मीठ, साखर, काळी मिरी, तेल आणि अन्य काही जिन्नस असतात. त्यांना द्रवरूप देऊन त्या इंजेक्शनने टोचून घेत आहेत.
शरीर आकर्षक करण्याचा अशा प्रकारचा अघोरी उपाय पाहून डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे शरीर पुष्ट करण्याची पद्धत अत्यंत घातक आहे. त्याने दीर्घकालीन समस्या भेडसावू शकतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, या इशाऱ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून अनेक लोक, विशेषतः तरुणी हा ट्रेंड आजमावून पाहत आहेत.
These Congolese women are injecting chicken stock into their butts in hopes of making them look bigger. pic.twitter.com/QgYrXpfc6G
— VICE (@VICE) July 20, 2018

































































