
सामना प्रतिनिधी, मुंबई
तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि व्हॉटस्ऍप संभाषण पॉर्नसाइटवर टाकणाऱ्याला बुधवारी पवई पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार ही अंधेरी परिसरात राहते. तिचे फेसबुकवर अकाऊंट आहे. नुकतेच तरुणीचे व्हिडीओ एका पॉर्नसाइटवर अपलोड झाल्याची माहिती तिच्या मित्रांनी दिली. ते व्हिडीओ स्वतःचे असल्याचे समजताच तरुणीला धक्काच बसला.
अटक झालेला तरुण आणि तरुणी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. तरुणीने घडल्याप्रकरणी पवई पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तरुणाने व्हिडीओ अपलोड केल्याची कबुली दिली. त्याची पवई पोलीस कसून चौकशी करत आहेत.

























































