युवासेनेतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

41

सामना प्रतिनिधी । पेण

पेण तालुक्यातील पाबळ खोर्‍यातील पाच आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना युवासेनेतर्फे मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पेण तालुका अधिकारी चेतन मोकल यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची गरजच ओळखून स्वखर्चाने युवासेनेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप केले.

पाबळ विभागातील मोहाडी, झापडी, गौळवाडी, बरडावडी, कोंडवी येथील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, युवासेना पेण तालुका अधिकारी चेतन मोकल यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी बोलताना चेतन मोकल म्हणाले की, आदीवासी विद्यार्थ्यांच्या पाठिशी युवासेना खंबीरपणे उभी राहील तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यात करीता प्रयत्न करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी युवासेना उपजिल्हा अधिकारी आशिष वर्तक, पेण तालुका युवा चिटणीस राकेश मोकल, पेण शहर अधिकारी प्रसाद देशमुख, उपविभागप्रमुख अनंत सत्वे, कोंडवी शाखाप्रमुख नरेश शिंदे, उपविभाग युवा अधिकारी निलेश शिंदे, कोंडवी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या