युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विभागीय सचिव, विस्तारक, सहसचिव व मुंबई समन्वयकपदी नियुक्त्या केल्या आहेत. ही माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

विभागीय सचिव ः विराज कावडिया (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर). विस्तारक ः चैतन्य बनसोडे (जळगाव लोकसभा), अजिंक्य चुंबले (रावेर लोकसभा), कामेश जाधव (वाशिम जिल्हा), विपुल पिंगळे (लातूर जिल्हा), परिक्षित पाटील (बीड जिल्हा), विशाल ससाने (जुन्नर, आंबेगाव, खेड). नीलेश बडदे (शिरूर, भोसरी, हडपसर), हर्षद कारकर (वडगांव शेरी, पुणे कॅन्टॉन्मेंट, पर्वती), अजिंक्य धात्रक (कसबा, शिवाजीनगर, कोथरूड),
शंभू बागुल (धुळे लोकसभा), सचिन बांगर (शेगांव, राहुरी, पारनेर), संजय साटम (नगर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड), वैभव थोरात

(नागपूर लोकसभा), गणेश कवडे (सोलापूर लोकसभा).

सहसचिव ः बाळा लोकरे, मुंबई समन्वयक ः शुभम शिंदे.