पिंपरी-चिंचवडच्या तळवडेत फटाका गोदामाला आग, सात जणांचा होरपळून मृत्यू

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथील तळवडे गावातील फटाका गोदामाला आग लागल्याने सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या गोदामातून आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही काही जण गोदामात अडकून पडले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.