
1 / 14
शुक्रवारी शीव येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह येथे शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात जोरदार भाषण करत पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले, पुन्हा नव्याने लढण्याचा निर्धार केला. ह्या सोहळ्याला सौ. रश्मी वहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.






























































