‘शबरीमाला’ वाद पेटला; केरळ बंद, हिंसाचार

64
shabrimala-1

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

शबरीमाला मंदिरात काल दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर आता वाद पेटला असून विविध हिंदू संघटनांनी पुकारलेल्या ‘केरळ बंद’ला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. रस्ता रोको केले गेले. या वेळी हिंसक वळण लागले. दरम्यान, दगडफेकीत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

कुठे काय घडले?

  • कनकदुर्गा आणि बिंदू या महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याने गुरुवारी शबरीमाला कर्म समितीच्या नेतृत्वाखाली विविध हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने काळा दिवस पाळला.
  • 12 तासांच्या बंदला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. तिरुवनंतपुरमसह कोझिकोडी, पल्लकड, कोलम आदी शहरांमध्ये रस्ता रोको करण्यात आले. बस सेवेला मोठा फटका बसला.
  • केरळमधील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद होत्या.
  • कन्नूर, कोझिकोडीसह अनेक ठिकाणी दगडफेक करीत बसेस, ऑटो रिक्षा फोडण्यात आल्या. पोलिसांच्या गाडय़ांवरही दगडफेक केली.
  • कालीकत, कन्नूरसह विविध विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या.
  • माकप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत कर्म समितीचे कार्यकर्ते पंडलम (55) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
  • गुरुवारी शबरीमाला मंदिरात प्रचंड गर्दी उसळली होती. शबरीमाला मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुककोंडी झाली.
आपली प्रतिक्रिया द्या