
इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली असताना कंपन्यांना आता इलेक्ट्रिक वाहन बनवण्याकडे कल वाढला आहे. त्यात एका तरूणालाही इलेक्टॅिक वाहनाची भर असली आहे. अशातच मध्यप्रदेशच्या एका वीस वर्षीय तरूणाने चक्क इलेक्ट्रिकल सायकल बनवली आहे. त्याची ही सायकल त्यांच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. त्याच्या या अनोख्या प्रयोगाबाबत सर्वस्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
आदित्य शिवहरे असे त्या तरुणाचे नाव आहे. आदित्यने अनेक महिन्यांपासून केलेल्या मेहनतीला यश आले आहे. त्याने एक इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. या सायकलची किंमत 20हजार रूपये असून ती पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 30 किमी चालू शकते. सायकलमध्ये देण्यात आलेल्या फिचर्समध्ये या सायकलला एका बाईकप्रमाणेच एक्सेलेरेटर, ब्रेक , लाईट, हॉर्न बरोबरच त्याला एक मोबाईल स्टॅण्डही आहे. तसेच ही सायकल 100किलोपर्यंतचे वजन पेलू शकते. कारण लोकेशन पाहताना मोबाईलचा वापर करता येऊ शकतो. ही सायकल सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, सायकल बनवणाऱ्या आदित्यने सांगितले की, टू व्हिलर कंपनीकडून विकली जाणारी बाईक ही महागडी असते. जी प्रत्येकजण खरेदी करू शकत नाही. त्यामुळेच माझ्या डोक्यात अशाप्रकारची सायकल बनविण्याची कल्पना आली. ज्याचा रिझल्ट तुमच्यासमोर आहे. जर ही सायकल मार्केटमध्ये लॉन्च केली, तर ही सायकल कोणाीही खरेदी करू शकतात. तो एक मोठा बदल असणार आहे. या इलेक्ट्रिक सायकलचे नाव ए1 ठेवले आहे.
आदित्यनेे याआधीही वयाच्या 16व्या वर्षी विना ताऱ्यांची वीज बनवली आहे. त्यावेळी त्याची तारीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पुढे तो सांगतो की, त्याने आतापर्यंत जे काही शिकले त्याची प्रेरणा त्याला महान संशोधक थॉमस एल्वा एडिसन यांच्याकडून मिळाली आहे. त्यांनी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला होता. कारण एडिसनलाही समाजहिताशी निगडित कामे करण्यात रस होता, मीही त्यांच्यासारखे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे.



























































