ऑनलाईन गेमचा टास्क म्हणून 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या

43
suicide

सामना ऑनलाईन । पुणे

ऑनलाईन गेमचा टास्क म्हणून पुण्यात एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिवाकर माळी असे मृत तरुणाचे नाव असून तो लोणीखंड परिसरात राहत होता.

दिवाकर माळीने आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहिली होती. त्यात त्याने स्वतःला ब्लॅक पँथर म्हटले आहे. चिठ्ठीत दिवाकरने म्हटले आहे की, “ब्लॅक पँथर पिंजर्‍यातून सुटला आहे. त्याला कुठलेच बंधन नाही. दी एन्ड.” त्या चिठ्ठीत त्याने ब्लॅक पँथरचे चित्रही काढले आहे.

दिवाकरला ब्ल्यु व्हेल सारख्या गेमचे व्यसन चढले होते अशी माहिती त्याची आई आणि शेजारच्यांनी दिली. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष द्यावे असे आवाहन दिवाकरच्या आईने केले आहे. मुलांना अशा गेमचे व्यसन लागू नये म्हणून काळजी घ्या असेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या