अल कायदाच्या 9 दहशतवाद्यांना केरळ, पश्चिम बंगालमधून अटक

राजधानी दिल्लीसह देशाच्या मोठ्या शहरांमध्ये घातपात घडवून आणण्याचा मोठा कट एनआयएने उधळून लावला. पश्चिम बंगाल व केरळात एनआयएने छापेमारी करून अल कायदाच्या नऊ अतिरेक्यांना जेरबंद केले.

नुकतीच दिल्लीत अल कायदाचा तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आली. या अतिरेक्यांनी दिलेल्या माहितीवरून एनआयएने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादेतून सहा तर केरळच्या एर्नाकुलममधून तिघांना ताब्यात घेतले. या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणावर जिहादी साहित्य, देशी बंदुका, धारदार शस्त्रे, स्फोटके बनवण्याचे साहित्य, डीजिटल डिव्हाईस जप्त करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या