बहुप्रतीक्षित ‘यंग्राड’चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने हे नेहमीच वैविध्यपूर्ण कथा आणि त्यांच्या आगळ्या हाताळणीच्या माध्यमातून चित्रपटनिर्मिती करण्यासाठी ओळखले जातात. ‘यंग्राड’ हा त्यांचा आणखी एक तसाच ‘हट के’ चित्रपट घेऊन ते येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता शरद केळकर, सविता प्रभुणे, शशांक शेंडे, चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, जीवन कराळकर आणि शिरीन पाटील या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक मकरंद माने, विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सचे विठ्ठल पाटील, फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेडचे गौतम गुप्ता व गौरव गुप्ता आणि फँटम फिल्म्सचे मधु मंटेना उपस्थित होते. ‘यंग्राड’ चित्रपटाची निर्मिती फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सने केली असून हा चित्रपट ६ जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

विठ्ठल पाटील (विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स), गौतम गुप्ता, गौरव गुप्ता (फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेड) आणि मधु मंटेना (फँटम फिल्म्स) यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘यंग्राड’चे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे. चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहेत. त्याशिवाय चित्रपटात शरद केळकर, सविता प्रभुणे शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गणगणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन मकरंद माने यांनी केले असून त्यांनी या चित्रपटाची पटकथा शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांच्यासह लिहिली आहे. युवा संगीत दिग्दर्शक हृदय गट्टानी आणि गंगाधर यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील आणि माघलुब पूनावाला यांनी लिहिली आहेत. यातील चार गाणी शंकर महादेवन, दिव्य कुमार, शाश तिरुपती आणि हृदय गट्टानी यांनी गायली आहेत.

‘यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो हिंदुस्थानची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.

‘यंग्राड’चा ट्रेलर दाखल करताना आम्हाला आनंद होत आहे. ही प्रभावित करणाऱ्या चार युवकांची कथा असून हे कुमारवयीन युवक त्या संस्कारक्षम आणि बळी पडू शकेल अशा वयातील मैत्री, निरागसता, प्रेम, कुटुंब व मुल्ये यांचे महत्व अधोरेखित करतात,” निर्माते विठ्ठल पाटील म्हणतात. ‘यंग्राड’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताना मला विशेष आनंद होत आहे. मराठी सिनेमामध्ये प्रेरणादायी अशी गोष्ट आणि दमदार कथा असतात. त्यांच्या जोडीला कसदार अभिनेत्यांची फळी असते. आमहाला हे सर्व आमच्या प्रेक्षकांसमोर आणताना विशेष आनंद होत आहे,” असे मधु मंटेना यांनी म्हटले आहे.

‘यंग्राड’चा ट्रेलर दाखल करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. फ्युचरवर्क्सचा हा चित्रपटनिर्मितीतील पहिलाच प्रयत्न आहे. तो प्रेक्षकांना आवडेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे,” असे उद्गार फ्युचरवर्क्स मिडियाचे गौतम गुप्ता यांनी काढले. दमदारपणा, ऊर्जा आणि अविस्मरणीय व्यक्तिरेखा या वैशिष्ट्यांनी चित्रपट नटला असून तो प्रेक्षकांना खिळवून ठेवेल एवढे निश्चित. ही भव्य अशी कथा ६ जुलै २०१८ रोजी पडद्यावर साकारात आहे.