
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी क्रिकेट संघातील सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याचा एक धमाल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पांड्या आणि धवनचा हा बाथरूम व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनत असून या व्हिडीओमध्ये दोघांचा मस्त डान्स पाहायला मिळत आहे. हे दोघेही एका इंग्रजी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत.
दोघांचा हा ३१ सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून चाहत्यांनी त्यांच्या या डान्सची मनमुराद प्रशंसा केली आहे. हार्दिक पांड्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्वीट केला आहे. व्हिडीओमध्ये दोन्ही क्रिकेटपटू बाथरूममधील आरशामध्ये पाहून डान्स करताना दिसत आहेत. पांड्याने व्हिडीओला एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे. ‘मी आणि जट्टा अॅक्शनमध्ये आहोत. आम्हाला गाणे म्हणणे आणि डान्स करणे अतिशय आवडते’, असे कॅप्शन पांड्याने या व्हिडीओला दिले आहे.
Me & jatta caught in action. We love dancing & singing. @SDhawan25 pic.twitter.com/P4vqsuxUVh
— hardik pandya (@hardikpandya7) July 1, 2018
आयर्लंडनंतर आता इंग्लंडचा धुव्वा उडवा
आयर्लंडचा टी-२०मध्ये २-० असा विजय मिळवल्यानंतर हिंदुस्थानचा सामना इंग्लंडची होणार आहे. दोन्ही संघातील पहिला टी-२० सामना मंगळवारी होणार आहे. धवन आणि पांड्याने आयर्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली होती आणि इंग्लंडविरुद्धही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे.



























































