
देशभरात रविवारी 13 सप्टेंबरला नीटची परिक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीने परिक्षेच्या एक दिवस आधीच आत्महत्या केली आहे. ज्य़ोती दुर्गा असे त्या विद्यार्थीनीचे नाव असून तिने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. नीटच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दोन दिवसातली दुसरी घटना आहे.
मदुराई येथील पोलीस निरिक्षक मुरुगा सुंदरम यांची ज्योती ही मुलगी होती. 18 वर्षांची ज्योती नीटच्या परिक्षेची तयारी करत होती. ज्योतीला आपण परिक्षेत नापास होऊ याची भीती वाटत होती म्हणून तिने स्वत:च्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली. ज्योतीने सुसाईड नोट लिहून तिच्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नका असे सांगितले आहे.
याआधी 9 सप्टेंबरला अरियालूर जिल्ह्यातील एलाथानकुझी येथील एका 19 वर्षाच्या विद्यार्थ्याने विहरीत उडी टाकून जीव दिली होता. वि विघ्नेश असे त्या विद्यार्थ्याचे नाव होते.
























































