नव्वदच्या दशकात नारायण राणे सुपारी घ्यायचे, आमदार वैभव नाईक यांचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मला मारण्याची सुपारी दिली असे म्हणणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे नव्वदच्या दशकात काय करायचे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राणेंनी कुणाच्या हत्येच्या सुपाऱ्या दिल्या, त्यांच्यावर न्यायालयात हत्येच्या कटाचे किती दोषारोपपत्र आहेत हे जगजाहीर आहे, अशा शब्दांत कुडाळचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री राणेंच्या आरोपांना उत्तर दिले.

दसरा मेळाव्यात लाखो लोक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकत होते. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची ताकद दिसू लागल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना त्याचाच पोटशूळ आहे. नारायण राणे यांच्यासारखे लोक आपण चर्चेत आले पाहिजे म्हणून अशा प्रकारची विधाने करतात. त्यांच्या विधानाला काही अर्थ नाही आणि त्यांच्या राजकीय भविष्याला महाराष्ट्रात थारा नसल्याचे आमदार नाईक म्हणाले.