स्टेट बँक ऑफ इंडिया नोकरभरती ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे ज्युनिअर असोसिएट्स या पदाकरिता घेण्यात येणाऱ्या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे, या न्याय्य मागणीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ प्रयत्नशील आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तीकर, सरचिटणीस, शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांच्या सुचनेनुसार सदर बँकेच्या नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग दिवाळीनंतर महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, दादर येथे रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के – 9892699215, श्रीराम विश्वासराव – 9869588469, विलास जाधव – 9619118999 व सुधाकर नर – 9867634856 याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी कळविले आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरभरतीकरिता ऑनलाईनद्वारे www.Wi.co.in/careers या संकेतस्थळावर 27 सप्टेंबर 2022 पूर्वी  अर्ज केलेला आहे.