
एका व्यक्तीने गुरुवारी दुपारी मंत्रालयाच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. खासगी वृत्तवाहिनीवरून याची माहिती देण्यात आली आहे. ही व्यक्ती न्याय मागण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असल्याचं कळतं आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मंत्रालयाच्या पहिल्या मजवल्यावर जाळी बसवण्यात आली असल्याने याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्यक्तीचे नाव, तो कुठून आला यासंदर्भात माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.


























































