
छत्रपती शिवाजी महाराज, तसेच नररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी इतिहासाची चुकीची मांडणी करणाऱया ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला संभाजीराजे छत्रपती यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड सुरू आहे. पेंद्रीय समितीवर विश्वास नसल्याचे स्पष्ट करीत, अशा चित्रपटांचे प्रथम महाराष्ट्रात स्क्रीनिंग झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपट ‘झी मराठी’वर दाखविला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना संभाजीराजे म्हणाले, ‘‘आपण अजून हा चित्रपट पाहिला नाही; पण काही इतिहासकारांनी चुकीच्या पद्धतीने या चित्रपटात मांडणी केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या चित्रपटात स्त्रियांविषयीची दृश्ये आक्षेपार्ह पद्धतीने दाखविण्यात आली आहेत. आपली भूमिका चुकीची असेल, तर इतिहास संशोधकांनी बोलावे. आपण पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू यांची लढाई दाखविणे मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखविण्यापेक्षा चित्रपट काढूच नका. खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो,’’ असेही संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहासकारांची नेमणूक आवश्यक असून, ऐतिहासिक घटनांवरील चित्रपटांचे पहिले स्क्रीनिंग महाराष्ट्रात झाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही संभाजीराजे म्हणाले.





























































