
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे चिथावणीखोर विधानं करत होते. याच दरम्यान बोम्मई यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठा गदारोळ झाला. मात्र वादविवाद झाल्यानंतर बोम्मई यांनी हे ट्विट आपण केले नसल्याचे म्हटले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांची री ओढत त्यांनी हे ट्विट केले नसल्याचे सांगितले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. दोघे ही खोटे बोलुन जनतेला येड्यात काढत आहेत त्या ट्वीट मुळे कर्नाटक मधील मराठी माणसाला मार खावा लागला हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी लक्ष्यात ठेवावे, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात.
दोघे ही खोटे बोलुन जनतेला येड्यात काढत आहेत त्या ट्वीट मुळे कर्नाटक मधील मराठी माणसाला मार खावा लागला हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी लक्ष्यात ठेवावे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 19, 2022
जयंत पाटलांचे एलन मस्क यांनाच आवाहन
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे? असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk , आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ? https://t.co/bmTMkjTOkv
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 19, 2022
काय होतं ट्विट?
महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचं सरकार सीमावादावर कोणतीही तडजोड करणार नाही, असे ट्विट बोम्मई यांनी केले. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांना लक्ष्य केले.
शहांची मध्यस्थी
दरम्यान, सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दिल्लीमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुप्रीम कोर्टाद्वारे हे प्रकरण सोडवले जात नाही तोपर्यंत कोणीही चिथावणीखोर विधानं करू नये असे शहा यांनी म्हटले.





























































