
महावितरणने वीजचोरांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात भांडुप परिमंडळात महावितरणच्या भरारी पथकाने तब्बल 5 हजार 670 ठिकाणी धाडी टाकत 18 कोटी 84 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरीचा छडा लावण्यासाठी महावितरणकडून कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांची मीटर तपासणी केली जाते. तसेच औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापराची झाडाझडती घेतली. त्यानुसार 18 कोटींची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये ठाणे मंडल कार्यालयाअंतर्गत 7 कोटी 35 लाख रुपये, वाशी मंडल कार्यालयात 6 कोटी 89 लाख रुपये व पेण मंडल कार्यालयात 2 कोटी 56 लाखांची वीजचोरी पकडली आहे. याशिवाय आकडा टाकून वीजचोरी करण्याची 647 प्रकरणे समोर आली. त्यामध्ये 1 कोटी 42 लाखांची वीजचोरी समोर आली आहे





























































