
स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजे बाबुजी यांच्या जीवनावर बायोपिक येणार आहे. चित्रपटाचे नाव ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ असे आहे. यामध्ये बाबुजींची भूमिका सुनील बर्वे साकारणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याविषयी सुनील बर्वे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याची माहिती दिली. बर्वे यांनी लिहिलेय, शूटिंग झाले, पण पडद्यावर माझे काम कसे दिसतेय याची अतिशय उत्सुकता होती. आता डबिंग सुरू झालेय, माझ्या कामाबरोबरच बाकी सर्व कलाकारांचीही उत्तम कामे पाहून खूप आनंद झाला आणि दिग्दर्शक योगेश देशपांडे याचे खूप काwतुक वाटले! अजून चित्रपट पूर्ण होण्याची थोडी प्रक्रिया बाकी आहे, पण एपंदरीत आम्हा सगळय़ांचे प्रयत्न योग्य दिशेने होतायत हे नक्की!





























































