बोलीभाषा टिकण्यासाठी व मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी सर्वांनीच योगदान द्यायला हवे, डॉ.तानाजीराव चोरगे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामिण साहित्य संमेलन येथे होऊ शकले. साहित्यीकांनी नेहमीच सकारात्मकता मांडायला हवी. भाषा आणि समाजा-समाजात वाद, विद्धंस होईल, असे लिखाण लेखकांनी करू नये. बोलीभाषा टिकण्यासाठी व मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी सर्वांनीच योगदान द्यायला हवे असे उद्गार ग्रामीण,कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.तानाजीराव चोरगे यांनी काढले.आज साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.दिवसभर परिसंवाद,ग्रामीण कथाकथन आणि काव्य संनेलनाने कृषी,सहकार आणि मराठी साहित्याचा गजर झाला.

डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने तालुक्यातील मांडकी पालवण येथे आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या ग्रामिण कृषी, सहकार मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले, शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामिण साहित्य संमेलन येथे होऊ शकले. साहित्यीकांनी नेहमीच सकारात्मकता मांडायला हवी. भाषा आणि समाजा-समाजात वाद, विद्धंस होईल, असे लिखान करू नये. बोलीभाषा टिकण्यासाठी व मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी सर्वांनीच योगदान द्यायला हवे. स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले, जगात शेती आणि शिक्षण हेच शाश्वत आहे. अलिकडच्या ग्रामिण लेखनामध्ये शेती, संशोधन समस्या येत नाहीत. त्यामुळे साहित्यीकांनी यााकडे लक्ष दिले पाहिजे. यानिमीत्त डॉ. तानाजी चोरगे लिखीत आंदोलन या पुस्तकाचे तसेच स्मरणीचे प्रकाशन करण्यात आले. सुत्रसंचालन संजय भुस्कुटे तर आभार अरूण इंगवले यांनी मानले. यावेळी पदमश्री पोपटराव पवार, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिल्पा सुर्वे, समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे, बाबाजी जाधव, जयवंत जालगांवकर, अजय चव्हाण, सागर देशपांडे, डॉ. राजन गवस आदी उपस्थित होते.