
क्षणिक राज्यस्तरीय दमदार कामगिरी शाळेच्या विद्याथ्यानी क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या प्रज्ञाशोध व होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि अरुणोदय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला झेंडा रोवला आहे. गुणवत्तेचा ठसा उमटवत राज्यस्तरावर मुलांनी दमदार कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता तिसरीतील कौस्तुभ गावकर याने राज्यात ७४ वा क्रमांक मिळवत उत्कृष्ट यश संपादन केले. तसेच इयत्ता सहावीतील अजिंक्य मंडलिक याने १५८ वा क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. विज्ञान क्षेत्रातही
आहे. प्रतिष्ठेच्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत सहावीतील भूषण सक्रे याने आपल्या वैज्ञानिक प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना सादर करत सिल्व्हर मेडल आणि सन्मानपत्र पटकावले.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापक सुरेश नारोळे यांचे प्रेरणादायी नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण झाली आहे. गावकर, मंडलिक आणि सक्रे या तिन्ही विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे अरुणोदय प्राथमिक शाळेचे नाव महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात उजळले आहे.

























































