
चित्रपट सृष्टीमधील कपल्सचा स्वतःचा असा एक फॅन बेस असतो. तमन्ना भाटिया आणि विजय दोघंही अगदी मेड फाॅर इच अदर वाटायचे, परंतु गेल्यावर्षी त्यांच्यात झालेल्या ब्रेकअपमुळे त्यांच्या दोघांच्याही आयुष्यावर या गोष्टीचा चांगलाच परिणाम झालेला आहे. तमन्नासोबतच्या ब्रेकअपनंतर विजय वर्मा पूर्णपणे खचला होता. त्याने काही काळ मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता.
तमन्ना आणि विजय हे दोघेही जवळपास दोन वर्षे नात्यात होते. मात्र या ब्रेकअपचा विजयवर खूप मोठा परिणाम झाला. अलीकडेच विजयने खुलासा केला की, त्याने स्वतःला सुमारे १४ महिने प्रसिद्धीपासून दूर ठेवले, जेणेकरून लोकांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर नाही, तर पुन्हा त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, विजय म्हणाला की, लोकांच्या अति हस्तक्षेपामुळे त्याला खूप त्रास झाला. त्याने आपल्या नात्याबद्दल – डेटिंग किंवा ब्रेकअपबद्दल – कधीही उघडपणे चर्चा केली नसतानाही, ही चर्चा खूप रंगली होती. त्यामुळेच त्याने काही काळ सर्वांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता.
या विषयासंदर्भात अधिक बोलताना, विजय म्हणाला गेल्या वर्षभरात त्याच्याबद्दल अनेक नकारात्मक गोष्टी छापून आलेल्या आहेत. तो म्हणतो,”जग इतक्या वेगाने बदलत आहे की, मला त्याच्याशी जुळवून घेणे शक्य होत नाही.
विजयने कबूल केले की, कामातून ब्रेक घेण्याचा एक फायदा म्हणजे तो त्याच्या कुटुंबाच्या आणि प्रियजनांच्या अधिक जवळ आला. विजय म्हणाला, “मला जाणवले की मला या सगळ्यात राहायचे नाही. म्हणून मी मला आवडणारे काम करायला सुरुवात केली. मी अलीकडेच एक मोठे घर विकत घेतले आहे आणि माझ्या कुटुंबाला शक्य तितक्या वेळा भेटायला बोलवण्याचा प्रयत्न करतो.”
येत्या काही दिवसांमध्ये विजय आपल्याला त्याच्या आगामी ‘मटका किंग’ या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे.
























































