
आपले केस हे आपल्या सौंदर्याचा आरसा असतात. त्यामुळेच केसांना नियमित मालिश करणे देखील खूप गरजेचे असते. केसांना मालिश केल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. काळ्याभोर लांबसडक केसांसाठी आपल्या डोक्याला नियमितपणे मालिश करणे खूप गरजेचे आहे.
नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. मेथीचे दाणे आणि नारळाचे तेल हे मिश्रण केसांमध्ये जादुई फरक आणते आणि केसांना आणि टाळूला पोषण देते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेथी आणि खोबरेल तेल केसांना लावल्याने केसांची वाढ वाढते. यामुळे केस लांबसडक आणि सुंदर होतात, तसेच केसांना खोबरेल तेल-मेथी लावण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून रोखण्यासाठी, नारळाचे तेल आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले हे हर्बल तेल तुमच्या केसांना लावू शकता. केसांची ताकद वाढवण्यासोबतच, ते केसांना अकाली पांढरे होण्यापासून देखील रोखते.
केसांमधील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी मेथी प्रभावी आहे. यासोबतच मेथी केसांची चमक वाढवण्यासही मदत करते.
2 चमचे मेथीचे दाणे आणि मूठभर कढीपत्ता 100 मिली नारळाच्या तेलात 10-15 मिनिटे उकळवा. नंतर हे तेल थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तेल गाळून बाटलीत भरा. शॅम्पू करण्यापूर्वी तुम्ही हे तेल तुमच्या टाळूला मसाज करण्यासाठी वापरू शकता. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी, नारळाचे तेल आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले हे तेल लावू शकता. हे तुमच्या टाळूला देखील पोषण देते. पोषण मिळाल्याने केस मऊ आणि रेशमी होतात आणि केसांची ताकदही वाढते.
नारळाच्या तेलात लॉरिक अॅसिड असते हे केसांच्या मुळांसाठी खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मेथीमध्ये आढळणारे प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड सारखे घटक केसांची वाढ वाढवतात. यामुळे केसांची लांबी वाढते.
























































