
गोरेगाव पूर्व येथील एका प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या कॉन्सर्ट पार्टीत दोन विद्यार्थ्यांचा अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकरणी वनराई पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या घटनेवरून महाराष्ट्र काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने याबाबत एक ट्विट करत सरकारला धारेवर धरले.
”मुंबईत मंत्रालयापासून तासभर अंतरावर सहजपणे ड्रग्ज उपलब्ध होतात तर राज्याच्या इतर शहरांमध्ये काय स्थिती असेल? देशाच्या आर्थिक राजधानीत बेकायदेशीर तस्करीमार्गे येणारे अंमली पदार्थ रोखण्यात मोदी सरकार तर राज्यात या पदार्थांची विक्री रोखण्यात फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अदानीच्या मालकीच्या गुजराती बंदरातून व उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांकडून होणारा ड्रग्जचा धंदा भाजपच्या आशीर्वादाने होत आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हे विचारण्याची वेळ राज्यातील कोट्यवधी नागरिकांवर आली आहे”, असे महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केले आहे.
मुंबईत मंत्रालयापासून तासभर अंतरावर सहजपणे ड्रग्ज उपलब्ध होतात तर राज्याच्या इतर शहरांमध्ये काय स्थिती असेल? देशाच्या आर्थिक राजधानीत बेकायदेशीर तस्करीमार्गे येणारे अंमली पदार्थ रोखण्यात मोदी सरकार तर राज्यात या पदार्थांची विक्री रोखण्यात फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.…
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 14, 2026


























































