उन्हाळी सुट्टीनिमित्त मध्य रेल्वेवर 168 अतिरिक्त विशेष गाड्या धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे 168 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. मुंबई ते चेन्नई/हैदराबाद/संत्रागाची/वाराणसी/बंगळूरू आणि पुणे ते गाझीपूर शहर व संत्रागाची दरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येतील. एलटीटी-वाराणसी गाडी क्रमांक 01125 6 मे 2026 रोजी शिक्षक विशेष गाडी म्हणून धावेल आणि गाडी क्रमांक 01126 वाराणसीहून सुटणारी 12 जून 2026 रोजी शिक्षक विशेष गाडी म्हणून धावेल.

सीएसएमटी-चेन्नई-सीएसएमटी दरम्यान 16 साप्ताहिक विशेष गाड्या, सीएसएमटी-हैदराबाद-सीएसएमटी दरम्यान 24 साप्ताहिक विशेष गाड्या, चालवण्यात एलटीटी-संत्रागाची-एलटीटी दरम्यान चार विशेष गाड्या, एलटीटी-वाराणसी-एलटीटी द्विसाप्ताहिक 40 विशेष गाड्या, एलटीटी-वाराणसी-एलटीटी दरम्यान दोन शिक्षक विशेष गाड्या, एलटीटी – श्री एम विश्वेश्वरैया टर्मिनस बंगळूर – एलटीटी दरम्यान 26 साप्ताहिक विशेष गाड्या, पुणे-संत्रागाची-पुणे दरम्यान 4 विशेष गाड्या, पुणे – गाझीपूर शहर – हडपसर दरम्यान 44 द्विसाप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.