
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी सुमारे 40 मिनिटे दूरध्वनीवरून चर्चा झाली. इराण युद्धविरामानंतर दोन्ही नेत्यांमध्ये हा पहिलाच संवाद होता. इराण युद्धावरून दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला राहणे आवश्यक आहे, यावर मोदी आणि ट्रम्प यांनी भर दिला.
मोदींनी ‘एक्स’वर या चर्चेची माहिती दिली. माझे मित्र राष्ट्रपती ट्रम्प यांचा मला पह्न आला. आम्ही दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये झालेले काम आणि विकासाबाबत चर्चा केली. भविष्यात हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंध अधिक मजबूत करू, यावर आमचे एकमत झाले, असे त्यांनी नमूद केले.






























































