
विठ्ठलभक्तांना आता पंढरीच्या वारीचे वेध लागले आहे. विठ्ठल भेटीच्या ओढीने वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहत आहेत. अशातच संत तुकोबांच्या वारीचे वेळापत्रक आज जाहीर झाले.
आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी होत असल्याने आतापासूनच पंढरीच्या वारीचे नियोजन केले जात आहे. संत तुकोबांची पालखी यंदा 7 जुलैपासून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य देऊळवाडय़ातून संत तुकाराम महाराजांची पालखी भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान निघणार आहे. हा पायी पालखी सोहळा 18 दिवसांचा प्रवास करून 24 जुलै रोजी पंढरीत दाखल होईल. यंदा पालखी सोहळ्याचे 341 वे वर्ष आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानाने याबाबत माहिती दिली.


























































