अवकाळीग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 16 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा उभ्या पिकांना मोठा फटक बसला होता. शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या भागातील सुमारे 22 हजार अवकाळीग्रस्त शेतकऱयांना राज्य सरकारने 16 कोटी 71 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे.

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड, गोंदिया, गडचिरोली या जिह्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. ही मदत जिल्हाधिकाऱयांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. कोणत्याही शेतकऱयांना दोनदा मदत दिली जाणार नाही याची दक्षता तहसीलदार व जिल्हाधिकाऱयांनी घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे 24 जिह्यांत अंदाजे 1 लाख 500 एकराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱयांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.