
उरण- जासई येथील तलाकात आंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे जासई गावावर शोककळा पसरली आहे. जासईतील एका चाळीत राहणाऱया रेहाना परकीन (8), रकीना परकीन (7), सौम्या प्रजापती (13) तीनही अल्पकयीन मुली आज सायंकाळी पोहण्यासाठी तलाकात उतरलेल्या होत्या. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तीनही मुली पाण्यात बुडाल्या. दोन दिवस पाणी न आल्यामुळे या मुली आंघोळीसाठी तलावावर गेल्या होत्या. करिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
टिळकनगर येथे आज वैद्यकीय शिबीर
टिळकनगर येथील वेदांत प्रतिष्ठानच्या वतीने उद्या, रविवारी भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार कल्याण केंद्र बिल्डिंग क्र. 10 समोर, लोकमान्य टिळक मैदान, टिळकनगर चेंबूर येथे सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत हे शिबीर होणार आहे. या शिबिरात सर्वसामान्य तपासण्यांसह कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. मेमोग्राफीच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सरचीही तपासणी होणार आहे. त्यासाठी कामा रुग्णालयाचे सहकार्य लाभले असून या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन वेदांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुनाथ मिठबावकर यांनी केले आहे.
स्वामी संस्थेतर्फे आज वहय़ा वाटप
परळ येथील स्वामी अर्थात सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन ऍण्ड एर्न्व्हायमेंट या संस्थेच्या वतीने गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना वहय़ा, कंपासपेटी, रंगपेटी अशा शैक्षणिक साहित्यांची वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम उद्या रविवार सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पोस्ट गल्ली, बँक ऑफ बडोदा शेजारी, परळ या संस्थेच्या कार्यालयात होणार आहे.

























































