
सेप्टिक टँक साफ करताना विषारी वायूमुळे गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना सुरतच्या वराछा खंड बाजार येथे हिऱ्याच्या कारखान्यात रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. कारखान्यातील सेप्टिक टँकची नियमित सफाई सुरू होती. एक सुपरवायजर आणि तीन कामगार सफाईसाठी टँकमध्ये उतरले होते.




























































