वृक्षारोपणासाठी एक लाख खड्ड्यांची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कणकापूर, कांचने ग्रुप ग्रामपंचायतीने राह फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे 300 एकर क्षेत्रात वृक्षारोपणासाठी एक लाख खड्डे खोदले. लवकरच तेथे विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नुकतेच सरपंच बारकू वाघ, उपसरपंच जगदीश शिंदे आदींच्या हस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण पार पडले. पुढील दोन महिन्यांत संपूर्ण वृक्षारोपण करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. रोपांच्या संगोपनासाठी दोन शेततळे स्थानिक शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वाने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवड, संगोपन, जलसंवर्धन आणि स्वच्छ, सुंदर व हरित गाव करण्यासाठी सर्वच जण प्रयत्नशील आहेत. या उपक्रमामुळे जागतिक हवामान बदलासह जैवविविधता जपण्यासाठी मोठा फायदा होईल. येणाऱ्या दोन-तीन वर्षांत कणकापूर जिह्यात हरित गाव म्हणून विकसित होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.